सुशील कन्या प्रणिती शिंदे यंदा काँग्रेस चा “हात” उंचावणारच…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499
“जय सिद्धेश्वर महाराज” आणि शहेनशहा ए सोलापूर “शाहजहुर अली” बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची सोलापूर नगरी,एक औद्योगिक शहर म्हणुन हि ओळख,भारता लां स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळाले परंतु त्याच्या हि आधी सोलापूर आणि जनतेने स्वातंत्र्याचा सर्वात पहिल्यांदा आनंद तो 1935 च्या दरम्यान घेतला…
अनेक ऐतिहासीक,राजकीय,सांस्कृतिक घटनांचा “साक्षीदार” असणारा आमचा सोलापूर,तसा तो फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असलेला…एखाद्या सोलापूर कराने मारलेली का बे…… ची हाक आणि उफाळलेल्या चहा बरोबर सुरु झालेल्या गप्पा हा जगातला सर्वात आनंदी अनुभव…
रंगा अण्णा वैद्य,काडादी,चंदेले,सारडा, धनशेट्टी,कुर्बान हुसैन,शिंदे,चाकोते,शिवदारे, वल्याळ या सारख्या विद्वान लोकांच्या विचारांनी प्रभावित होऊन गुण्या गोविंदाने नांदत असलेलं शहर…
आणि अशातच 2024 च्या लोकसभा निवडणुकी चे बिगुल वाजले,गेली दहा वर्षे निवडून दिलेल्या कर्तव्य शून्य लोकांनी सोलापूर ची केलेली हालत आणि याच कारणाने वैतागलेला सोलापूर कर यांच्या भावना तीव्र होणे साहजिकच…

अशातच प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीने तमाम सोलापूर करांना “उम्मीद ची आखरी किरण” दिसली,अन् त्यात विरझन टाकायला “भामटे सम्राट” फडणवीस यांचा चेला सातपुते याची उमेदवारी भाजपा ने डीक्लेर केली…
ज्या लोकांनी GST लावून,मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण न देउन,पक्ष फोडाफोडी करून जनतेत कोलाहल माजवला अशांना सोलापूर कर थारा देतील हा शंकेचा विषय आहे…
राजकारणात कार्यकर्ता हा जेंव्हा जनतेतून निवडून जातो तेंव्हा तो आपल्या नेत्याशी किती प्रामाणिक आहे हे हि आवर्जुन पाहिले जाते,फडणवीस नावाचा “टिळा” लावून माळशिरस मध्ये दाखल झालेल्या अ भा वि प च्या सातपुते ला कोणी हि ओळखत नव्हते फक्त पक्षादेश म्हणुन अकलूज च्या मोहिते पाटलांनी निवडून दिलेले सातपुते खाल्ल्या मिठाला सुद्धा जागले नाहीत हे मात्र तितकेच खरे…
असं बाहेरुन आलेलं “पार्सल” येथील जनतेवर लादलेले अजिबात चालणारं नाही कारण सोलापूर आणि सोलापूरकर हा विषयच अत्यंत भावनिक असून या वेळेस सुशील कन्या प्रणिती शिंदे ह्या काँग्रेस चा “हात” नक्की उंचावतील यात मात्र तिळमात्र शंका असण्याचे कारण नाही…



