अकलूजमध्ये फोटोग्राफर दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार व AI वर्कशॉप उत्साहात संपन्न; फोटोग्राफर संघटनेच्या नूतन कार्यकारी समितीची घोषणा

अकलूज (प्रतिनिधी):कादर शेख
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून आज, २४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘फोटोग्राफर अकलूज शहर व परिसर संघटना’ यांच्या वतीने पाटीदार भवन (सुजित गार्डनच्या पाठीमागे, अकलूज) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मान्यवरांचा सत्कार, एआय (AI) तंत्रज्ञान वर्कशॉप आणि संघटना सभासद नोंदणी अभियान अतिशय उत्साहात पार पडले. या सोहळ्यासाठी अकलूज आणि परिसरातून सुमारे ७० ते ८० छायाचित्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. के. इनामदार आणि अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे उपस्थित होते. याप्रसंगी सोलापूर येथून विशेष उपस्थित राहिलेले मान्यवर दत्ता शिंदे, आनंद शिंदे, अमोल पोतदार, हरिभाऊ नगरे, बालाजी नवले सर तसेच अकलूज येथील सत्यजित दोशी, दिलीप माने, दत्तात्रय लिपारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.डिजिटल युगात फोटोग्राफीमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती देण्यासाठी मुन्ना पठाण सर यांनी उपस्थितांना ‘एआय (AI) वर्कशॉप’ द्वारे मार्गदर्शन केले. एआय तंत्रज्ञानाचा फोटोग्राफी आणि एडिटिंगमध्ये प्रभावी व सोपा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक त्यांनी या वेळी दिले.

कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ माने यांनी संघटनेच्या उद्दिष्टांची माहिती देऊन उपस्थित सर्व छायाचित्रकारांना संबोधित केले व संघटनात्मक बांधणीवर भर दिला.
या सोहळ्यात फोटोग्राफर अकलूज शहर व परिसर संघटनेची नूतन संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली
अध्यक्ष: सोमनाथ माने
उपाध्यक्ष: कादर शेख
सचिव: विक्रम माने
सहसचिव: रणजीत एकतपुरे
खजिनदार: आनंद खुरुडकर
सदस्य: सुरज बोरगावकर, अभिषेक भालेराव, साहिल पठाण, भारत जवंजाळ, किशन काळे, शिवाजी कुदळे, बाबासाहेब एकतपुरे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, कार्यक्रमाचा शेवट उत्साहात आणि शुभेच्छांच्या वर्षावात झाला.



