शहर

सफाळे पोलिसांची कारवाई.. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून 52 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील देवभूमी कॉम्प्लेक्समधील हेल्थ न्यूट्रिशन सेंटरचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने 22 ऑगस्ट रोजी रात्री आत प्रवेश करून या सेंटरमधील ऑनलाइन क्लाससाठी वापरण्यात येणारा 48 हजार रुपये किमतीचा टीसीएल कंपनीचा 52 इंची एलसीडी टीव्ही व 4,800/- रोख रक्कम, असा एकूण 52,800 किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून फरार झाले होते

याबाबत फिर्यादी विजय बाबू पवार, वय 33 वर्षे, व्यवसाय–न्यूट्रिशन क्लब, रा. वृंदावन कॉम्प्लेक्स, सफाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सफाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सफाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास केला. या तपासादरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी राजू बबलू मिश्रा, वय 22 वर्षे, रा. साई नंदनवन, भोईरपाडा, सफाळे यास निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आले.

या आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 48,000/- किमतीचा टीसीएल कंपनीचा 52 इंची एलसीडी टीव्ही व 4,800/- रोख रक्कम, असा एकूण 52,800/- किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार केणी हे करीत आहेत.

सदर कारवाई यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर; विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर आणि उमेश गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता शेळके, सहायक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे; पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर व ज्ञानेश्वर सावंत तसेच पोलीस अंमलदार कल्पेश किणी, शिवाजी चिमकर, भावेश देशमुख आणि रामदास ठाणगे यांच्या पथकाने केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button