विशेष

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त अकलूजमध्ये भव्य रक्तदान शिबीर; १०२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकलूज : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र सणाचे औचित्य साधून सहायता वेलफेअर फाउंडेशन आणि मदनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १०२ समाजप्रिय रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असून आपल्या एका बाटली रक्तामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवीन जीवनदान मिळू शकते, या मानवतावादी भावनेतून विविध समाजातील युवक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात हिरिरीने भाग घेतला. ईदच्या धार्मिक व पवित्र पर्वाला मानवसेवेची जोड देत आयोजित केलेल्या या उपक्रमातून अकलूजमध्ये सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि मानवतेचा एक आदर्श संदेश निर्माण झाला.

शिबीर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी आयोजकांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या सर्व १०२ दात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

“रक्तदान करा, जीवन वाचवा” या ब्रीदवाक्याला अनुसरून भविष्यातही नागरिकांनी अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी शेवटी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button