क्राईम

पालघर महावितरणाचा वायरमेन आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी दादाराम करांडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :70305166401

घरमालकाला आलेले जास्तीचे विद्युत मीटरचे बिल कमी करून देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार करणाऱ्या पालघर महावितरणाच्या वायरमनला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पंचा समक्ष अटक करून त्यांच्याविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पालघर येथील 32 वर्षीय तक्रारदार यांच्या घरातील मीटरचे बिल जास्त आले म्हणून त्यांनी याबाबत पालघर महावितरणचे वायरमन प्रदीप सुभाष महाजन वय वर्ष 28 राहणार उमरोळी याला विचारणा केली असता त्यांनी हे जास्तीचे बिल कमी करून देतो या बदल्यात मला आठ हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती.

याबाबत या 32 वर्षीय तक्रारदार यांनी या वायरमेनची लिखित तक्रार 19 ऑगस्ट रोजी पालघर लाच लुचपत प्रतिबंध विभागात केली होती.
याबाबत या विभागाने या तक्रारीची पडताळणी करून शिवराज पाटील पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली दादाराम करांडे पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोये, जितेंद्र गवळे, प्रकाश दळवी,आकाश लोहारे या पथकाने गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मिठागर रोड खारेकुरण पालघर येथे सापळा रचून वायरमन प्रदीप सुभाष महाजन याला तक्रारदार यांच्याकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात अटक करून त्याच्या विरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button