सामाजिक

रमजान ईद निमित्त करमाळ्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलीस स्टेशन येथे आज रमजान ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक पोलीस उपनिरीक्षक पोपट टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी प्रा, कलीम काझी, माजी नगरसेवक शौकत नालबंद, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीर तांबोळी, नगरसेवक अहमद कुरेशी,जामा मस्जिद चे विश्वस्त जमीर सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आझाद शेख मुस्तकीन पठाण जामा मस्जिद चे विश्वस्त हाजी उस्मान सय्यद सामाजिक कार्यकर्ते सुरज शेख, नासीर कबीर हाजी महंमद अली शेख,आलीम शेख, अशपाक सय्यद,अफरोज पठाण,इंदाज वस्ताद, साजीद बेग आदी जण उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक टिळेकर म्हणाले की रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान व शहरातील सर्व मशीदीमध्ये सामुदायिक नमाजपठण करण्यात येत असून करमाळ्यात हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रमजान ईद साजरी करण्याची परंपरा आहे आणि सर्वांनी मिळून ईद शांततेत व सलोखा कायम ठेऊन साजरी करण्याचे आवाहन टिळेकर यांनी केले आहे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान,संगम चौक,फुलसौदर चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत असुन ईद दिवशी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी गोपनीय चे गणेश दळवी यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button