आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मुंबई येथे आढावा बैठक संपन्न माढा लोकसभेची जागा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना देण्याची मागणी

उपसपादक—-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक मुंबई.. येथे संपन्न झाली ज्यामध्ये
सोलापूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा आमदार कु.प्रणितीताई शिंदे यांना व माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवारी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना मिळावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे करण्यात आली.

याचे निवेदन प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुधीर लांडे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले.निवेदनामध्ये डॉ. धवलसिंह दादा मोहिते पाटील यांच्यासारखे उच्च विद्याभूषित सक्षम नेतृत्व असल्याने माढा लोकसभेची उमेदवारी दिल्यास ही जागाही सोलापूरसह काँग्रेस निश्चित विजयी होईल.
असा अहवाल प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे सादर करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी मंत्री आरिफ नसीम खान सोलापूर मध्य आमदार प्रणितीताई शिंदे,प्रदेश सरचिटणीस मा.राजेंद्र आपा शेलार त्यांच्याकडेही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार,उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण जिल्हा संघटक रमेश हसापुरे प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राशिद शेख,जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील,ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हा प्रमुख संग्राम जाधव, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष वसीम पठाण जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस दिपकराव खोचरे पाटील,जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे माढा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष ऋषिकेश बोबडे करमाळा प्रतापराव जगताप सांगोला अभिषेक कांबळे माळशिरस सतीश पालकर पंढरपूर हणमंत मोरे माण खटाव तालुक्याचे पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



