विकास सोसायट्यांनी शासनाच्या विविध योजना राबवाव्यात-शैलेश कोतमिरे

माळीनगर(प्रतिनिधी)- टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
सहकारी संस्थांसाठी शासनाच्या विविध योजना असतात या योजनेसाठी भरीव अनुदान दिले जाते. अशा योजना विविध कार्यकारी सहकारी संस्थेने राबवून संस्था भरभराटीला आणाव्यात असे आवाहन राज्य सहकारी संस्थाचे अप्पर आयुक्त व विशेष निबंधक शैलेश कोतमिरे यांनी येथे बोलताना केले.

येथील शुगरकेन प्रोड्युसर्स विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शैलेश कोतमिरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस सभासद व संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी हे बोलताना संचालक मंडळाला आवाहन केले.
ते पुढे म्हणाले,तुम्हाला ज्या योजना राबवायच्या आहेत त्याचे प्रस्ताव दाखल करा. आम्ही व आमचे अधिकारी सहकार्य करू. त्यासाठी जास्तीत जास्त योजना चा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. यावेळी संस्थेचे चेअरमन अमोल ताम्हाणे व्हा.चेअरमन कपिल भोंगळे यांनी संस्था दरवर्षी १५ टक्के लाभांश आणि सभासद धारण ठेवींवर १० टक्के व्याज सभासदांना दिले जाते.आणि पिक कर्ज,विमा,बी बियाणे, किटकनाशक औषधे क्रेडिट वर देणे अशा विविध योजना राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली.

यावेळी विषेश लेखाधिकारी श्री.ढोपे, सीनियर बँक इन्स्पेक्टर श्री.दीक्षित,डीडीआर रवींद्र गायकवाड, असिस्टंट रजिस्ट्रार एम एल शिंदे आदी अधिकाऱ्यांसह सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे ,संस्थेचे संचालक नामदेव आगम, सुरेश राऊत, सुरेंद्र बधे, मनीष रासकर, विशाल गिरमे, जयवंत चौरे,कुणाल इनामके, मनोहर जाधव,अलका बोरावके,विद्या गिरमे,विजय नेवसे,मिलिंद गिरमे,हेमंत रासकर,शालिनी राऊत,कल्पेश पांढरे,वि.रा.जाधव,श्री. देशपांडे,महावीर वाघ,संस्थेचे कॅशिअर गिरमे,मॅनेजर अनिल गिरमे उपस्थित होते.
यानंतर संस्थेने संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्यकाळातील माजी चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.प्रास्ताविक मॅनेजर अनिल गिरमे यांनी केले.सूत्रसंचलन संचालक सुरेंद्र बधे यांनी केले.

शुगरकेन वि.का.स सोसायटी माळीनगर या संस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी शैलेश कोतमिरे,राजेंद्र गिरमे,श्री.गायकवाड,अमोल ताम्हाणे,कपिल भोंगळे, सुरेंद्र बधे,जयवंत चौरे,कुणाल इनामके आदी.



