विशेष

सफाळे विटी लाईन सद्गुरु मॉल जवळ दोन दुचाकी स्वारांचा दुर्दैवी अपघात…एक बाईक स्वार जागीच ठार तर दोन अल्पवयीन दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640

गणेशोत्सवाच्या दिवशी सफाळे येथे एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी अपघाती घटना घडली आहे.या अपघातामध्ये दोन दुचाकी स्वारांचा समोरासमोर ठोकर लागून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन अल्पवयीन दुचाकी स्वार लहान मुले गंभीर रित्या जखमी झाली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी माकणे येथील स्वास्तिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जलसार गावातील (42) वर्षीय सायमन वासुदेव भोईर मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी अडीच वाजता सफाळे विटी लाईन रस्त्यावरून Q4-EE-3610 ही ब्लू कलर ची स्प्लेंडर घेऊन जलसार येथे घरी जात असताना तो माकणे सद्गुरु मॉल जवळ आला असताना त्याच्या समोरून सफाळे दिशेकडे जाणारी MH-48-BW-1006 ही स्कुटी घेऊन मिथिलेश वाघ वय वर्ष (15) आणि तनिष्क साळवी वय वर्ष (15) दोघेही राहणार नाईन स्टार माकणे हे आले असताना या दोघांमध्ये झालेल्या अपघातामध्ये सायमन भोईर याचा जागीच मृत्यू झाला असून तनिष्क साळवी व मिथिलेश वाघ हे दोघे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर माकणे येथील स्वस्तिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button