पालघर जिल्ह्यातील डहाणू पुरवठा विभागातील गोदाम लिपिकाला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने केले रंगेहात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
लोकांना मदत म्हणून रेशनिंग कार्ड काढून देणाऱ्या 32 वर्षीय इसमांकडून 4000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी डहाणू पुरवठा विभागातील गोदाम लिपिकाला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील तहसील कार्यालयात नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी येणाऱ्या लोकांना मदत करून रेशनिंग कार्ड काढून देणाऱ्या 32 वर्षीय इसमाकडे डहाणू पुरवठा विभागातील लिपिक सचिन बाळासे व्हरगर (वय वर्ष 32) यांनी 18 ऑगस्ट रोजी आठ रेशन कार्ड काढून देण्यासाठी 4000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी 18 ऑगस्ट रोजी या लिपिकाची तक्रार पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात केली होती.
या तक्रारीची पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतर शिवराज पाटील पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार प्रकाश दळवी, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे या पथकांनी बुधवार दिनांक 02 सप्टेंबर 2026 रोजी डहाणू तहसील कार्यालय पुरवठा विभाग येथे सापळा रचून पंचा समक्ष सचिन व्हरगर या लिपिकाला तक्रारदार यांच्याकडून सहा रेशनिंग कार्ड साठी 3000 रुपये अशी रोख रक्कम लाचेच्या रूपात स्वीकारताना रंगेहात अटक करून त्याच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे



