आरोग्य

अकलूज येथे मंगळवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

Times 9 Marathi News Network

अकलूज : अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ.रेशमाताई लालासाहेब आडगळे व गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (महंमदवाडी, हडपसर, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक विशाल प्रकाश मोरे आणि नगरसेविका नम्रता राहुल जगताप यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची माहिती व नियोजन
दिनांक: मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ०९.०० वाजता
स्थळ: समता नगर जिल्हा परिषद शाळा, समता नगर, अकलूज
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये
डोळ्यांच्या सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाईल.
डोळ्यांचे कोणतेही ऑपरेशन मोफत केले जाईल.
गरजेनुसार डोळ्यांमध्ये लेन्स बसवल्या जातील.
डोळ्याचे चष्म्याचे नंबर काढून दिले जातील व नंबरचा चष्मा अल्प दरात उपलब्ध करून दिला जाईल.

विशेष टीप
डोळ्यांचे सर्व ऑपरेशन एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी (पुणे) येथे केले जाणार असून रुग्णांना घेऊन जाण्यासह मोफत सेवा दिली जाणार आहे.

प्रभाग क्रमांक ३ मधील तसेच अकलूज परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button