आरोग्य

विझोरी आयुष्मान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय ‘गुणवत्ता आश्वासन मानांकन’ प्राप्त; डॉक्टर ते आशा सेविका… सर्व टीमचे योगदान ठरले मोलाचे

सरकारच्या ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानां’तर्गत दिलेल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात (NQAS) सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने घवघवीत यश संपादन केले आहे. माळशिरस तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर विझोरी या आरोग्य उपकेंद्राने उत्कृष्ट कामगिरी करत ८६.९२% गुणांसह राष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे.

यशात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य
हे मानांकन मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि संपूर्ण आरोग्य पथकाने अथक परिश्रम घेतले.

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, उपसंचालक डॉ. भगवान पवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हे यश मिळवण्यात आले.

माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल आव्हाड, डॉ. बीना आर्वे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संभाजी शिवाजी गंगधरे, आरोग्य सेवक दयानंद झेंडे, आणि आरोग्य सेविका श्रीमती रेश्मा बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रक्रियेत जिल्ह्याचे गुणवत्ता अधिकारी डॉ. निखिल फताटे व पांडुरंग आघाव सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर व उपकेंद्रातील आरोग्य सहाय्यक राजू शेख, आरोग्य सहाय्यिका श्रीमती सुप्रिया मोरे व सुनीता क्षीरसागर आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले.

तळागाळातील आरोग्य सेवा पोहोचवण्यात गटप्रवर्तक सुरेखा ठोंबरे, ॲम्ब्युलन्स चालक राजीव कदम आणि आशा वर्कर्स — रेश्मा शेख, सोनाली वाघमोडे, आशा बोरकर, साधना साठे, राणी गोरवे, अर्चना मिसाळ यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

या प्राप्त मानांकनामुळे मिळणाऱ्या विशेष निधीचा वापर विझोरी उपकेंद्रामधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या विकासासाठी केला जाणार आहे. या यशामुळे परिसरातून आरोग्य कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button