महाराष्ट्र

माही ऑनलाइन सर्व्हिसेस अँड बांधकाम कामगार ई-सेवा केंद्राचे थाटामाटात उद्घाटन. नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते फित काटून केंद्राचा शुभारंभ

Times 9 Marathi News Network

अकलूज : येथील कर्मवीर चौक, महाळुंग रोड परिसरात ‘माही ऑनलाइन सर्व्हिसेस अँड बांधकाम कामगार ई-सेवा केंद्रा’चे भव्य व थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. युवा नेते तथा अकलूज नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते फित काटून या सेवा केंद्राचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला या केंद्राचे प्रमुख करण चंद्रकांत खंडागळे यांनी सहकुटुंब नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. अकलूज आणि परिसरातील नागरिकांना तसेच विशेषतः बांधकाम कामगारांना शासकीय योजना, ई-सेवा आणि ऑनलाइन कागदपत्रांची कामे एकाच छताखाली उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या उद्घाटन प्रसंगी छगन निचळ, बाळासाहेब निचळ, श्रीकांत बोडरे, सोमनाथ कुचेकर, संजय लोखंडे यांच्यासह परिसरातील नागरिक, व्यापारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी करण खंडागळे यांच्या या नवीन उपक्रमास मनापासून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button