क्रीडा

‘महिला सन्मान चषक २०२६-२७’ : शिवरत्न क्रिकेट अकॅडमी ‘अ’ ठरली विजेती; शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

अकलूज प्रतिनिधी कादर शेख Times 9 Marathi News Network

अकलूज: न्यू अंजनीया डिस्ट्रीब्युटर्स (संग्रामनगर-अकलूज) आयोजित ‘महिला सन्मान चषक २०२६-२७’ या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शिवरत्न क्रिकेट अकॅडमी ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले, तर शंकरराव मोहिते महाविद्यालय (माळेवाडी) संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

शिवरत्न शिक्षण संस्था, डॉटर्स मॉम फाउंडेशन आणि शिवरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खालील खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले
उत्कृष्ट फलंदाज: रितिशा जाधव (शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-ब)
उत्कृष्ट गोलंदाज: मुस्कान दरवेशी (शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळेवाडी)
उत्कृष्ट यष्टीरक्षक (विकेटकीपर): अक्षता सावंत (शिवरत्न क्रिकेट अकॅडमी-अ)
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (फिल्डर): सीमा धुमाळ (पोलीस वाइफ इलेव्हन)

या स्पर्धेत एकूण ७ महिला संघांनी आपला सहभाग नोंदवला होता
शिवरत्न क्रिकेट अकॅडमी – अ
शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळेवाडी
स्टार ऑफ अकलूज
सनराइज् इलेव्हन
एस. एम. पी. स्कूल
पोलीस वाइफ इलेव्हन, अकलूज
शिवरत्न क्रिकेट अकॅडमी – ब
विजेता संघ: शिवरत्न क्रिकेट अकॅडमी ‘अ’
विजेत्या ‘शिवरत्न क्रिकेट अकॅडमी अ’ संघात वृषाली पवार, अक्षता सावंत, वैष्णवी मिसाळ, डॉ. आशा शेख, डॉ. वैष्णवी शेटे, स्वरांजली सावंत, स्वरांजली जाधव, कुसुम डांगी आणि साक्षी एकतपुरे या खेळाडूंचा समावेश होता.

या स्पर्धेत पंच म्हणून मंजीत नवले सर आणि जयराज पावशे यांनी काम पाहिले, तर स्पर्धेचे नियोजन आनंद पावशे सर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले. महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे अकलूज परिसरात विशेष कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button