जागतिक महिला दिना निमित्त अकलूज येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

आमीर मोहोळकर,अकलूज
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी
रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जगभर जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचे अमूल्य योगदान,त्यांची जिद्द,कर्तृत्व आणि नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे.महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा आणि महिलांमध्ये आत्मविश्वास,संघभावना व क्रीडाप्रेम वाढावे या उद्देशाने रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल,अकलूज येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते…
या स्पर्धेत शिवरत्न अकॅडमी अकलूज,राष्ट्रमाता जिजाऊ अकलूज,सावित्रीबाई फुले अकलूज तसेच स्टार्स ऑफ अकलूज या महिला संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.महिलांनी मैदानात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली…
या स्पर्धेसाठी अभय मेडिकल अकलूज,ओम रेमेडीज अकलूज,नेट टू वन इंटरवेब्स संग्रामनगर अकलूज आणि न्यू अंजनीया डिस्ट्रीब्यूटर अकलूज यांनी प्रायोजकत्व देऊन कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला…
या स्पर्धेत एकूण चार सामने खेळविण्यात आले.अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक सामन्यांनंतर स्टार्स ऑफ अकलूज हा संघ उपविजेता ठरला,तर उत्कृष्ट संघभावना आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करत शिवरत्न अकॅडमी अकलूज या संघाने विजेतेपद पटकावले…
या कार्यक्रमाचे उद्घाटन पी आय करिष्मा वनवे मॅडम (अकलूज पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच बक्षीस वितरण समारंभ डॉ.मोनिका मिसाळ यांच्या शुभहस्ते पार पडला.सर्व स्पर्धकांना मेडल देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट फलंदाज,सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक यांना विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले…
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाला रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो.केतन बोरावके,सचिव रो. अजिंक्य जाधव,प्रकल्प प्रमुख व संचालक रो अशा शेख मॅडम,तसेच रो.आशिष गांधी,रो.बबनराव शेंडगे,रो.नवनाथ नागणे,रो.सीए नितीन कुदळे,रो कल्पेश पांढरे,रो.पोपट पाटील,रो.अजित वीर,रो.सौ.तृप्ती कुदळे आणि रो.तेजस्विनी बोरावके यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली…
महिलांनी क्रीडा क्षेत्रातही आपल्या जिद्दीने आणि क्षमतेने मोठी उंची गाठू शकते,याचा प्रेरणादायी संदेश या स्पर्धेमधून देण्यात आला.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम महिलांच्या सशक्तीकरणाचा,आत्मविश्वासाचा आणि समानतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा ठरला…



