शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पद्मजाताई इंगवले-देशमुख यांच्या उपक्रमातून सामाजिक क्रांती…श्रीपूर येथे विधवा महिलांच्या हस्ते हळदी-कुंकू व साडी वाटप…

Times 9 Marathi News Network
पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपत शिवसेनेचे सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून,उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांच्या प्रेरणेतून श्रीपूर येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून एक ऐतिहासिक व पुरोगामी उपक्रम पार पडला.शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पद्मजाताई इंगवले-देशमुख यांच्या पुढाकाराने विधवा व निराधार महिलांना हळदी-कुंकू लावून साडी वाटप करण्यात आले,तसेच या माता-भगिनींच्या हस्ते लाडक्या भावांना राखी बांधून देशाला समतेचा व बंधुभाव जपणारा नवा संदेश देण्यात आला…
धार्मिक रूढी-परंपरा आणि जुनाट कनिष्ठ प्रथांना झुगारून लावताना पद्मजाताई इंगवले-देशमुख म्हणाल्या,”स्त्रीचे सौभाग्य हे केवळ तिच्या कपाळावरील कुंकवात नसून ते तिच्या अस्तित्वात असते.हीच स्त्री या देशाची सरस्वती,लक्ष्मी आणि प्रगती आहे.त्यामुळे पतीच्या निधनानंतर तिचे सौभाग्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात प्रथम प्राधान्य या विधवा व निराधार माता-भगिनींनाच देते.आपण सर्व माता जिजाऊ,माता रमाई,माता अहिल्या,माता फातिमा आणि माता सावित्रीच्या लेकी आहोत.”

हा कार्यक्रम श्रीपूर (तालुका माळशिरस,जिल्हा सोलापूर) येथील उजनी कॉलनी येथे शिवसेना तालुका प्रमुख नीताताई शिंदे यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहात पार पडला…
प्रमुख उपस्थिती व राखीचा मान…
सदर कार्यक्रमास शिवसेना ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भीमराव भूषणर पाटील,भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे,माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख विजय कोकणे,सोलापूर जिल्हा उपप्रमुख दीपक खंडागळे आणि सोलापूर जिल्हा संघटक बापूसाहेब लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी माळशिरस तालुका संघटक व ग्रामपंचायत सदस्य हेमंतराव चव्हाण यांना माता-भगिनींच्या हस्ते राखी बांधण्याचा विशेष मान मिळाला…
कामाची पावती आणि भव्य पक्षप्रवेश…
शिवसेनेच्या “रणरागिणी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मजाताई इंगवले यांनी सोलापूर व सांगली जिल्ह्यांत विधवा,निराधार व एकल महिलांसाठी भरीव काम केले आहे.महिलांना घरकुल मिळवून देणे,शिलाई मशीन वाटप करणे,रस्ते व गटारींचे प्रलंबित प्रश्न सोडवणे,घरगुती व्यवसाय,बचत गट बळकट करणे तसेच अन्याय-अत्याचाराविरोधात प्रत्यक्ष उतरून न्याय मिळवून देणे,या साठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत उपस्थित महिलांनी त्यांचा भव्य सत्कार व गौरव केला…
“महिलांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून न पडता स्वतःच्या सक्षमीकरणावर भर द्यावा…
भविष्यात महिलांचा कोणताही प्रश्न असो,तो तात्काळ सोडवला जाईल,” असे आवाहन पद्मजाताईंनी केले.त्यांच्या या विचारांनी प्रभावित होऊन कार्यक्रमादरम्यान शेकडो महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला…
या प्रसंगी पुष्पाताई वायदंडे,बेबीताई,महिला रोपटके,ममता शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक,कार्यकर्ते आणि शेकडो महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…



