”पालघर ते महाराष्ट्राच्या व्यापक पटापर्यंत ! – हिंदूश्री कुणालदादा पाटील ह्यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सहसंपर्कप्रमुख ओबीसी मोर्चा पदी नियुक्ती !!”

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
”अखंड-भारत चे स्वप्न, 5हिंदवी सुराज्याची विचारधारा, व्यवसायातून विकासाची दृष्टी, समाजकारणातून सेवाभाव, संघटनेतून नेतृत्व आणि महर्षी योगी श्री अरविंदांची योगसाधना — हिंदूश्री कुणालदादा पाटील यांचा बहुआयामी प्रवास !!”
“सामाजिक बांधिलकी, शासनव्यवस्था, युवा आणि महिला उद्योजक घडणावळ, आणि सर्वसमाज सक्षमीकरणाचा समन्वय साधत ‘राष्ट्र प्रथम’ या विचारातून आकार घेत असलेले महाराष्ट्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व.”
काही व्यक्तींची ओळख त्यांच्या पदामुळे निर्माण होते; तर काही व्यक्ती आपल्या कामाच्या विविध क्षेत्रांना एकत्र जोडत स्वतःची स्वतंत्र ओळख घडवत जातात. हिंदूश्री कुणालदादा पाटील यांचा आजवरचा प्रवास हा जाज्वल्य वक्तृत्त्व, सामाजिक बांधिलकी, सर्वसमावेशक धोरण, ग्रामीण विकास, युवक सक्षमीकरण, संघटनात्मक कार्य आणि व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांच्या संगमातून घडलेला आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेला विचार व्यापक आहे—“राष्ट्र प्रथम.” सार्वजनिक जीवनातील भूमिका असो, उद्योजकतेची कल्पना असो किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभारलेले उपक्रम; प्रत्येक बाबीकडे केवळ व्यक्तिगत प्रगतीच्या चौकटीत न पाहता समाज आणि राष्ट्राच्या व्यापक विकासाशी ती कशी जोडली जाऊ शकते, हा त्यांच्या विचारप्रक्रियेतील सातत्यपूर्ण धागा राहिला आहे.
व्यवसाय म्हणजे केवळ व्यवहार नव्हे, तर समस्या सोडवण्याचे माध्यम…
व्यावसायिक क्षेत्रात हिंदूश्री कुणालदादा यांनी स्वतःची ओळख केवळ उद्योजक म्हणून मर्यादित ठेवलेली नाही. व्यवसायाच्या माध्यमातून Finance, Legal Solutions, Business Strategy आणि Governance अशा क्षेत्रांना एका एकात्मिक चौकटीत पाहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते स्वतः फाउंडर & Managing Director, तसेच Strategic Business Architect आणि Public Policy & Governance Professional आहेत.
ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये आर्थिक संधी निर्माण करणे, उद्योजकतेस प्रोत्साहन देणे, शासनाच्या विविध योजनांपर्यंत सामान्य नागरिक आणि नवउद्योजकांचा प्रत्यक्ष प्रवेश वाढवणे आणि Finance–Legal–Business या तीनही बाबींचा समन्वय साधणे, हा त्यांच्या व्यावसायिक विचारांचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे. त्यांच्या दृष्टीने समाजासाठी जनतेसाठी सुख आणि समृद्धी चा मूलमंत्र म्हणजे ”व्यवसायातून वृद्धी कडे जाणे” हा आहे.

त्याचबरोबर AURONOVA, National Economic Navigator यांसारख्या संकल्पनांमधून तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, शासनाच्या योजना आणि आर्थिक सक्षमीकरण यांना जोडून सामान्य माणसापर्यंत आर्थिक सुबत्ता च्या संधीं पोहोचवण्याचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो.
समाजकारणाचा केंद्रबिंदू — संधी शेवटच्या माणसापर्यंत…
सामाजिक क्षेत्रात हिंदूश्री फाउंडेशन च्या माध्यमातून युवक, शिक्षण, मूल्यधारित विकास , ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, CSR, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जागृती अशा विषयांवर काम करण्याची दिशा त्यांनी स्वीकारली आहे.
त्यांच्यासाठी समाजसेवेचा अर्थ केवळ एखादा कार्यक्रम आयोजित करणे किंवा मदत वितरित करणे इतकाच मर्यादित नाही. शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करणे, उपलब्ध सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, युवकांमध्ये कौशल्य व उद्योजकता वाढवणे, त्यांच्यात नीतिमूल्य सुसंस्कृतपणा रुजवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणे—या आणि अशा अधिक संरचनात्मक विषयांकडे त्यांचा कल आहे.
शासनव्यवस्थेचा जवळून अनुभव…
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाशी संबंधित जिल्हा नियंत्रण समिती तसेच दूरसंचार मंत्रालयाशी संबंधित ठाणे–पालघर जिल्हास्तरीय समिती यांत दंडगा अनुभव. अनुभवातून शासनाच्या योजना, प्रशासकीय प्रक्रिया, ग्रामीण प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा यांच्यातील प्रत्यक्ष संबंध समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.
याशिवाय केंद्रीय खेळ मंत्रालय तर्फे आयोजित केलेल्या युवा उत्सव 2023 – India@2047, Palghar या उपक्रमाशी संबंधित जिल्हास्तरीय समन्वयाच्या कामामुळे युवक आणि राष्ट्राच्या अमृतकालीन विकासदृष्टीला जोडण्याचा अनुभव त्यांच्या सार्वजनिक प्रवासाचा भाग राहिला आहे.यामुळे त्यांच्या कामात एक वैशिष्ट्य जाणवते—ते एखाद्या विषयाकडे केवळ राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक अशा एका चौकटीतून पाहण्याऐवजी Governance + Economy + Society + Organisation या चारही अंगांनी पाहण्याचा प्रयत्न करतात.
समाजाच्या आर्थिक परंतु नीतिमूल्याधरित सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष…अलीकडील काळात त्यांच्या सार्वजनिक आणि संघटनात्मक कामाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू युवकांचे आर्थिक सक्षमीकरण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि शासनाच्या योजनांची शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत यशस्वी पोहोच आणि त्याचे योग्य सादरीकरण हा राहिला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारिणी वर सदस्य म्हणून नियुक्ती तसेच संघटनात्मक कार्यात त्यांना सहसंपर्कप्रमुख ओबीसी मोर्चा म्हणून जबाबदारी पक्षाच्या प्रदेश नेतृत्त्वाकडून दिली गेली आहे. ही जबाबदारी त्यांच्या सार्वजनिक जीवनाच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते—जिथे त्यांचा भर पदाच्या उल्लेखापेक्षा संवाद, संपर्क, संघटन आणि समाजाच्या आर्थिक प्रश्नांचे संरचनात्मक निराकरण आणि युवकांमध्ये नीतीमूल्यांची आणि सांस्कृतिक मूल्यांची पेरणी यावर राहणार असल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या कामाच्या दिशेतून दिसते.
पालघरपासून महाराष्ट्राच्या व्यापक पटापर्यंत…
पालघर हा त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक कामाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ग्रामीण भागातील युवक, रोजगार, स्वयंरोजगार, सर्व समाज, ग्रामस्तरीय संघटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि शासनाच्या योजनांचे प्रभावी अंमलबजावणीकरण या विषयांशी त्यांचा सातत्याने संबंध राहिला आहे.परंतु त्यांची विचारमर्यादा केवळ जिल्ह्यापुरती नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी युवा उद्योजकता, डिजिटल अर्थव्यवस्था, आर्थिक साक्षरता, शासनाच्या योजनांचे एकत्रीकरण आणि AI-आधारित मार्गदर्शन यांचा वापर कसा करता येईल, या दिशेने त्यांनी विविध संकल्पना मांडल्या आहेत.अशा प्रकारे स्थानिक वास्तव आणि व्यापक विकासदृष्टी यांची सांगड घालणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते.
विचारांचा पाया — राष्ट्र, संस्कृती आणि भविष्य…
त्यांच्या वैचारिक प्रवासावर महर्षी योगी श्री अरविंद घोष यांच्या राष्ट्रविचारांचा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासोबत सुराज्याच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्याच धारेतून त्यांनी स्वतःसाठी स्वीकारलेले “जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र” हे सूत्र त्यांच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विचारविश्वाचे प्रतीक म्हणून पुढे आले आहे.
मात्र त्यांच्यासाठी राष्ट्रवाद ही केवळ घोषणेची संकल्पना नसून मूल्यधारित शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण, उद्योगनिर्मिती, सुशासन, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतीची सुरक्षा आणि नागरिकांना स्वावलंबी बनविण्याच्या प्रक्रियेशी जोडलेली संकल्पना आहे.
याच विचाराला त्यांच्या अलीकडील सार्वजनिक मांडणीत तीन शब्दांत व्यक्त केले जाते—
“सेवा • संघटन • समर्पण”
एका चौकटीत न मावणारे व्यक्तिमत्त्व…
उद्योजक म्हणून युवक व ग्रामीण विकास विषयांवरील काम; आर्थिक आणि व्यावसायिक व्यवस्थेचा अनुभव; सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्य; शासनाशी संबंधित समित्यांमुळे प्रशासनाचा परिचय; सार्वजनिक धोरणांविषयीची रुची, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मूल्यधारित विचारधारा आणि आता महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील संघटनात्मक जबाबदारी—या सर्वांचा विचार केला तर हिंदूश्री कुणालदादा पाटील यांची ओळख एका पदनामात सामावणे कठीण ठरते.
त्यांचा आजवरचा प्रवास हा तयार झालेल्या फक्त एका मुक्कामाची गोष्ट नसून सतत विस्तारणाऱ्या एका प्रशस्त कार्यक्षेत्राची कहाणी आहे.
स्थानिक समस्यांचा अभ्यास करताना राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवणे, सामाजिक प्रश्नांकडे आर्थिक समाधानाच्या नजरेने पाहणे आणि सार्वजनिक जीवनामध्ये संघटनाला परिणामकारक कामाशी जोडण्याचा प्रयत्न करणे—हा त्यांच्या कार्यपद्धतीचा उलगडत जाणारा नमुना आहे.
आणि म्हणूनच त्यांच्या पुढील प्रवासाकडे पाहताना एक वाक्य त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा आशय व्यक्त करते—
“पद ही फक्त ओळख नाही ; समाजाच्या विश्वासाला कृतीत उतरवण्याची जबाबदारी आहे .”
आज सांस्कृतिक राष्ट्रविचारी समाजकारण, शासनव्यवस्था, व्यावसायिकता आणि संघटन या चारही क्षेत्रांना एकत्र जोडणाऱ्या नेतृत्वाची गरज वाढत असताना, हिंदूश्री कुणालदादा पाटील यांचा प्रवास हा ‘समाजाच्या सामूहिक आणि सांस्कृतिक प्रगतीकडे’ जाणाऱ्या विचाराचा प्रवास म्हणून समोर येतो.
आणि म्हणून त्यांच्याशी संवाद साधताना हे प्रकर्षाने जाणवले की त्यांच्यासाठी त्यांच जीवन अस्तित्त्व दुसर तिसर काही नसून –
”राष्ट्र हेच प्रथम, सेवा हेच ध्येय, संघटन हीच शक्ती, आणि विकास हीच दिशा” हे आहे.
⸻



