आरोग्य

शिवराणा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

Times 9 Marathi News Network

अकलूज :शिवराणा गणेशोत्सव मंडळ, महाळुंग रोड (अकलूज) यांच्या वतीने आज परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महाळुंग रोड परिसरासह समता नगर, रणजीत नगर, मसूद मळा व तांबोळी वसाहत येथील २०० ते २५० नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

सदर आरोग्य शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर अंतर्गत उपकेंद्र अकलूज २ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत सिंह (पी.एच.सी. माळीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रसंगी ए.एन.एम. सिस्टर सूर्यांगण, आरोग्य सेवक एच.एस. काळे, तसेच आशा स्वयंसेविका आर.ए. घोंगडे, आर.एस. एवढे, व्ही.एस. सावंत, एस.जी. जगताप, ए.एल. सदाफुले आणि आर.ए. सातव यांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली.

या शिबिरादरम्यान नागरिकांची रक्तदाब (BP), रक्तगट (Blood Group) व साखरेची (Sugar) तपासणी करण्यात आली. तसेच सर्दी, ताप, खोकला व इतर किरकोळ आजारांवर मोफत वैद्यकीय निदान करून मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. एल.गायकवाड सर, तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य जावेद बागवान आणि पत्रकार आमीर मोहोळकर यांनी विशेष भेट देऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला व मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवराणा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर लक्ष्मण सावंत, उपाध्यक्ष रोहन मयूर सावंत, सचिव आर्यन मोहन चव्हाण, खजिनदार प्रथमेश रुपेश पवार, कार्याध्यक्ष यश उमेश पवार यांच्यासह सदस्य सत्यम चव्हाण, शिवदत्त चव्हाण, आर्यन सावंत, विराज सावंत, स्वराज्य सावंत, स्वराज्य ढेरे पाटील, आदिल शेख, उमेश पवार, रुपेश पवार, उदय कुमार साळुंखे, रेहान मुलाणी आणि तोसिफ शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून शिवराणा गणेशोत्सव मंडळाने राबवलेल्या या स्तुत्य व सामाजिक उपक्रमाबद्दल अकलूज व पंचक्रोशीतून मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे जोरदार कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button