शहर

अकलूजमधील २१ कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार; नगरपरिषदेत घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण

अकलूज:
स्वतःच्या हक्काचे घर असावे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील २१ कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. अकलूज नगरपरिषदेच्या वतीने आज या २१ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीची पत्रे सन्मानपूर्वक वितरित करण्यात आली.

अकलूज नगरपरिषद कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात नगराध्यक्षा रेश्माताई लालासाहेब अडगळे आणि गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे प्रदान करण्यात आली.

गरजूंपर्यंत योजना पोहोचवण्याचा नगरपरिषदेचा ध्यास
“शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील, गरजू व पात्र नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी अकलूज नगरपरिषद कटिबद्ध आहे. ‘प्रत्येक कुटुंबाला हक्काचे छत’ मिळावे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून यावा, या हेतूने नगरपरिषद सातत्याने कार्यरत आहे,” असे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.

या २१ घरकुल मंजुरी पात्र लाभार्थी व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे
१) दिलीप बलभीम पवार
२) परवीन इब्राहीम खान
३) सुविधा सोमनाथ जाधव
४) नुरजहाँ अरबाज खान
५) दत्तात्रय प्रल्हाद भुसे
६) विजया गणपत फुले
७) भारत ज्ञानोबा ओहाळ
८) माणिक दिगंबर नवले
९) संजय दत्तू फुले
१०) आमिन महेबूब नदाफ
११) मुबीना आलीम शेख
१२) मुन्ना महंमद मुलाणी
१३) सुनंदा मधुकर भोराडे
१४) कोमल सागर मोहिते
१५) लक्ष्मी नागेश मिसाळ
१६) संतोष पवार
१७) रवी सुभाष गोपाळकर
१८) जीवन शिवाजी जावळे
१९) दिगंबर केरबा घोडके
२०) उर्मिला विनोद काशिद
२१) रामचंद्र जगन्नाथ बनकर

हातात घरकुल मंजुरीचे पत्र पडताच २१ लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. वर्षांनुवर्षांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाल्याने लाभार्थ्यांनी नगरपरिषद व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमास अकलूज नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, सचिन पाटील, मुख्याधिकारी यांच्यासह नगरपरिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button