आमदार संजय शिंदे यांनी बैठकीचा फार्स केला तरी उपयोग नाही, पुनर्वसन कामाचे खरे श्रेय माजी आमदार नारायण आबा पाटील यांनाच जाते पाटील गटाचा शिंदे गटाला टोला

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
बैठकीचा फार्स केला तरी उपयोग नाही, पुनर्वसन कामाचे खरे श्रेय माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनाच जाते असा टोला पाटील गटाकडून लगवण्यात आला. करमाळा तालुक्यातील पुनर्वसन कामावरून सध्या राजकरण चांगलेच तापले आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांनी मागील आठवड्यात पुनर्वसन कामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये दिली व यानंतर विद्यमान आमदार महोदयांनी येत्या 20 तारखेला एका शासकीय आढवा बैठकीचे आयोजन करण्यास संबधित विभागाला कळविले आहे.यावरून आज परत एकदा पुनर्वसन प्रश्न राजकारणाचे केंद्र बनू पाहत आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की विद्यमान आमदार महोदयांनी झारीतील शुक्राचार्य होऊन गेली चार वर्षे पुनर्वसन कामांची अडवणूक केली.
या कामात दिरंगाई निर्माण करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांची पाठराखण केली. आता करमाळा तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. यात काही पुनर्वसित गावांचा समावेश सुद्धा असल्याने केवळ राजकीय हेतू नजरेसोरून ठेवूनच या बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले. ही बैठक आदर्श आचार संहितेच्या नियमाचे उल्लंघन करते का हे तपासून याबाबत निवडणूक आयोगाकडे जरूर तक्रार केली जाईलच. परंतु अशा बैठकीचे फलित काहीच नसणार आहे.
विद्यमान आमदार महोदयांचा कल कागदोपत्री विकासकामे दाखवण्यावर अधिक असल्याने गेली चार वर्षे अशा बैठका अथवा पत्रव्यवहार केले जात आहेत. प्रत्यक्षात विकासाचे एकही ठोस काम जमिनीवर तर पूर्ण झाले असे दिसून येत नाही. दहिगाव उपसा सिंचन योजनेस सुप्रमा मिळाली पण निधी मंजूर नाही, जातेगाव – टेंभुर्णी रस्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरीत झाला पण कामाचा तपास नाही, उपविजकेंद्राच्या मंजुरीचे कागद रंगत आहेत पण प्रत्यक्षात उभारणी नाही, कुकडीचे पाणी मांगी तलावात व तेथून पुढे औद्योगिक वसाहतीत आणणार हे काम सुद्धा कागदावरच या अशा अनेक गोष्टी कागदोपत्री असून आमदार महोदयांच्या चार वर्ष कालावधीत ठोस विकासकामांचा शोध घेतला असता एकही काम दिसून येत नाही.
यामुळे मग गावभेट दौरा, आमदार आपल्या दारी, विविध विभागाच्या शासकीय बैठका याचा आधार आमदार महोदयांना घ्यावा लागत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी 2014 ते 2019 पर्यंत केलेली विकासकामे प्रत्यक्षात दिसून येत असून जनता आता 2024 च्या निवडणुकीची वाट पाहत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांची लोकप्रियता व विश्वास आजही जनतेत टिकून आहे. तालुका अंतर्गत निवडणुकामध्ये जनता माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत असल्याचे आजवरच्या निवडणूक निकालावरून दिसून येते.
यामुळे केवळ राजकीय हेतू नजरेसमोर ठेवून आयोजित बैठकीतून आमदार महोदयांना फारसे काही साध्य होणार नाही. पुनर्वसन,सिंचन, रस्ते विकास, वीज पुरवठा, आरोग्य सुविधा, ग्रामविकास यामधील माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेली कामे आज तरी कोणी पुसून टाकू शकत नाही असा विश्वास तळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.



