सरकारी लोखंडी मालाची चोरी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील टेंभीखोडावे गावातील पाच तरुणांवर केळवा सागरी पोलिसांनी केले गुन्हे दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील टेंभीखोडावे गावातून मुंबई अहमदाबाद कडे जाणाऱ्या जलद गती बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी आयात करण्यात आलेल्या बाराशे किलो लोखंडी कच्चा मालाची चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अवघ्या 48 तासात अटक करून त्यांच्या ताब्यातील लाखो रुपयांचा मुद्देमाल केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पथकाने हस्तगत केला आहे.
टेंभीखोडावे गावातून मुंबई अहमदाबाद कडे जाणाऱ्या जलद गती बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी या गावाच्या हद्दीत एल अँड टी कंपनीने करोडो रुपयांचा लोखंडी कच्चामाल साठवून ठेवला आहे. 22 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास टेंभीखोडावे गावातील पाच तरुणांनी MH 48 BM 5699 या क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पोचा वापर करून या साठवलेल्या लोखंडी मालातून लाखो रुपयांच्या लोखंडी कच्चामाल चोरी केला होता.
याबाबत एल अँड टी कंपनीच्या सफाळे विभाग एडमिन असिस्टंट अमित चव्हाण या अधिकाऱ्यांनी 23 जुलै रोजी केळवा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पथकाने अवघ्या 48 तासात या गुन्ह्यातील पाच आरोपींना मुद्देमालासह अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.



