शहर

सदफ शेखची बीटीएस परीक्षेत उत्तुंग भरारी; इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड!राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत सदाशिवराव माने विद्यालयाच्या चिमुकलीचे उज्ज्वल यशजयसिंह मोहिते-पाटील (बाळ दादा) यांच्या हस्ते कौतुक व शुभेच्छा

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marath News Network

अकलूज:राज्यात अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आणि ‘एज्युमेट अकॅडमी’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बीटीएस’ (भारत टॅलेंट सर्च) परीक्षेत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी सदफ शेख हिने उत्तुंग यश संपादन केले आहे. तिने संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाचा आणि अकलूज परिसराचा गौरव वाढवला आहे.

या स्पर्धा परीक्षेत सदफने १५० पैकी तब्बल १४८ गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरे स्थान निश्चित केले. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिला मानाच्या ‘इस्रो (ISRO) अभ्यास सहली’साठी निवडण्यात आले आहे. अवघ्या ८ वर्षांच्या वयात तिसरीत शिकत असताना सदफला हा बहुमान मिळाला असून, ही अभ्यास सहल ती विमान आणि रेल्वे प्रवासाद्वारे पूर्ण करणार आहे.

सदफच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आनंदयात्री शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक व ‘जाणता राजा’ जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (बाळ दादा) यांनी तिचे विशेष कौतुक करून पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. त्यांनी चिमुकल्या सदफशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले, तिचे कौतुक केले आणि भविष्यातील अभ्यासासाठी मोलाचे मार्गदर्शन करत इस्रो सहलीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सदफ शेख ही आलमगीर शेख (ग्रामपंचायत अधिकारी) यांची कन्या आहे. तिच्या या यशात सदाशिवराव माने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शेख मॅडम, वर्गशिक्षक प्रदीप मिसाळ सर तसेच ‘गुरु कीर्ती इन्स्टिट्यूट’च्या सर्वेसर्वा सौ. अर्चना लवटे (कोल्हटकर) मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

अवघ्या आठव्या वर्षी इस्रो अभ्यास सहलीचा मान मिळवणाऱ्या सदफ शेखचे सर्व स्तरातून, शैक्षणिक वर्तुळातून व नागरिकांकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button