शहर

अकलूज येथे अपंग वारकऱ्यांना तीन चाकी सायकलींचे वाटपशहाजीराजे देशमुख अपंग संघटनेचा उपक्रम; राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network

अकलूज : येथील उपजिल्हा उपरुग्णालय परिसरात उस्मानाबाद अहिल्यानगर येथील अपंग वारकऱ्यांना शहाजीराजे देशमुख अपंग संघटनेच्या वतीने तीन चाकी सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अपंग वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव मुख्तार भाई कोरबू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी बोलताना त्यांनी अपंग संघटनेच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि वारकऱ्यांची सेवा हेच ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला पत्रकार आत्माजी पवार, मुजीब कोरबू, जयदेव जयदे यांच्यासह अपंग संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने अपंग बांधव व वारकरी उपस्थित होते.

सायकल मिळाल्याने अपंग वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, या मदतीमुळे वारीत सहभागी होणे आणि दैनंदिन प्रवास करणे अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले. संघटनेच्या या उपक्रमाचे अकलूज व परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button