शहर

अकलूजमध्ये ‘नो डॉल्बी’ आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप!

Times 9 Marathi News Network

अकलूज: अकलूज शहर व पंचक्रोशीमध्ये यंदाचा गणेश विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. अकलूज पोलीस प्रशासनाने दिलेल्या ‘नो डॉल्बी’ (डीजेमुक्त विसर्जन) आवाहनाला सर्व गणेश मंडळांनी आणि अकलूजकरांनी शतप्रतिशत प्रतिसाद देत ढोल-ताशे, हलगी आणि लेझिम या पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

डीजेच्या कर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण अकलूज शहर दुमदुमून गेले होते. जुन्या संस्कृतीची आणि परंपरेची आठवण करून देणारा हा विसर्जन सोहळा पाहून अकलूज शहरातील गणेश भक्तांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. “दरवर्षी असाच पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन सोहळा पार पडावा,” अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली.

गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी अकलूज पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक (Addl. SP) प्रेरणा कट्टे
उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संतोष वाळके
पोलीस निरीक्षक (PI) नीरज उबाळे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.

विशेषतः अकलूज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकाटिकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी अत्यंत कडकडीत आणि नियोजनबद्ध बंदोबस्ताची धुरा सांभाळल्याने संपूर्ण विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. पोलिसांचे हे नेटके नियोजन आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा अकलूजकरांसाठी विशेष आणि कौतुकास्पद ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button