सफाळे विराथन बुद्रुक येथे असलेल्या विद्युत डीपीचा गावकऱ्यांना धोका

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :70305166660
महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या पालघर जिल्ह्यातील सफाळे रामबाग विभागाची विद्युत पुरवठा करणारी डीपी भर पावसात विराथन बुद्रुक येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओहोळाच्या खड्ड्यात उभी असल्या कारणामुळे या विद्युत डीपीच्या विद्युत प्रवाहाचा गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र विद्युत मंडळाची दहा गावांना विद्युत पुरवठा करणारी डीपी विराथन बुद्रुक येथील युअ फिटनेस व्यायाम शाळेजवळ आहे.
याच डीपीला लागून मेन रस्ता आहे या मेन वाहतुकीच्या रस्त्यावरून या भागातील नागरिक शाळकरी मुले व वाहतूकदार राजरोस प्रवास करतात तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या डीपीच्या अवतीभवती पाणी साचले असून ही डीपी भर पाण्यामध्ये रस्त्यात उभी आहे.
यामुळे या डीपीच्या विद्युत प्रवाहाचा पादचाऱ्यांना व वाहन चालकांना तसेच येजा करणाऱ्या शाळकरी लहान मुलांना शॉक लागून दुर्घटना शक्यता आहे या डीपी मुले शॉक लागून दुर्घटना घटना पूर्वी संबंधित विभागाने तातडीने ही डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावी किंवा या ठिकाणी पूर्णपणे मातीचा भराव करून या डीपीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



