शैक्षणिक

सदाशिवराव माने विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान व कार्यशाळा उत्साहात

Times 9 Marathi News Network

अकलूज, दि. २६ : येथील सदाशिवराव माने विद्यालयात ‘अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व तर्कशुद्ध विचार’ या विषयावर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक कार्यशाळेचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. या वेळी विविध वैज्ञानिक प्रयोगांच्या थेट सादरीकरणातून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेमागील वास्तव आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजावून सांगण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व कै. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले होते. प्रास्ताविकात त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील सूक्ष्म फरक स्पष्ट केला. “विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून जागरूक नागरिक बनावे,” असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. रामलिंग सावळजकर यांनी विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवली. त्यांनी खालील प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यामागील वैज्ञानिक स्पषटिकरण दिले

होम-अग्नी आपोआप प्रज्वलित होणे, केळीचे आपोआप काप होणे, उदबत्ती फिरणे आणि चेंडू कडक होणे.
लंगर तोडणे, काडेपेटीतील काड्यांची संख्या अचूक ओळखणे आणि संमोहन (Hypnosis) प्रक्रियेची वस्तुस्थिती.
या प्रयोगांच्या आधारे प्रा. सावळजकर यांनी समाजजागृती, विवेकवाद आणि अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहशिक्षक दादा ढोले व संदीप शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत आणि कल्पना मोरे.विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दादा ढोले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button