अकलूजमध्ये लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी व लहुजी साम्राज्य अकलूज तसेच नवनाथ (भाऊ) साठे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौक (जुने बस स्टँड शेजारी, अकलूज) येथे संपन्न होणार आहे.
🔹 सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांची वैशिष्ट्ये
१) गरजू मुलींच्या भविष्यासाठी प्रत्येकी ₹५,००० ची बँकेत मुदत ठेव (FD).
२) अकलूज नगरपरिषदेतील सफाई महिला कर्मचाऱ्यांना पैठणी साडी वाटप.
३) अकलूज परिसरातील लाडक्या बहिणींना मोफत साडी वाटप.
४) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ५,००० मोफत वह्यांचे वाटप.
५) १,००० केशर आंबा रोपांचे मोफत वाटप
६)अकलूज परिसरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहपत्नीक सन्मान सोहळा.
७) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा.
८) लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा कार्यक्रम.

🔹 प्रमुख उपस्थिती व मान्यवर:
कार्यक्रमाचे अध्यक्ष: रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर (माजी खासदार, माढा लोकसभा) प्रमुख उपस्थिती: राम विठ्ठल सातपुते (माजी आमदार, माळशिरस विधानसभा) विशेष उपस्थिती: डॉ. एम. के. इनामदार (हृदयरोग तज्ज्ञ) प्रकाश पाटील (अध्यक्ष, श्रीराम शिक्षण संस्था, पाणीव) सचिन शिंदे (जिल्हा सरचिटणीस, भाजपा) सुजयसिंह माने-पाटील (अकलूज मंडल अध्यक्ष, भाजपा) महादेव कावळे ( शहराध्यक्ष भाजपा, अकलूज) डॉ. अक्षय वाईकर (माजी युवा शहराध्यक्ष) राहुल लोंढे (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद) महेश शिंदे (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद) सौ. जयश्री एकतपुरे (नगरसेविका, अकलूज नगरपरिषद) सौ. दिपाली वाघमोडे (नगरसेविका, अकलूज नगरपरिषद) शाखाभाऊ कर्चे (सामाजिक कार्यकर्ते) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अकलूज व परिसरातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक नवनाथ (भाऊ) साठे मित्र परिवार अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे.



