शहर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०६ व्या जयंतीनिमित्त संपादक नौशाद मुलाणी यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ घोषित!पत्रकारांच्या कार्याची दखल, ‘हे’ पत्रकार ठरणार पुरस्काराचे मानकरी!

अकलूज (प्रतिनिधी): ताहेर मोहोळकर
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अकलूज येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या आणि पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कार’ ‘टाइम्स ९ मराठी न्यूज’ (Times 9 Marathi News) चे संपादक नौशाद मुलाणी यांच्यासह परिसरातील नामांकित पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान, निष्पक्ष वृत्तांकन आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे प्रश्न धसास लावल्याबद्दल या सर्व पत्रकारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकार संपादक नौशाद मुलाणी यांच्यासोबतच खालील पत्रकारांचा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये भाग्यवंत नायकुडे ( ज्येष्ठ पत्रकार) निनाद पाटील (पत्रकार) नागेश लोंढे (पत्रकार) सुखदेव साठे (पत्रकार) सचिन रणदिवे (पत्रकार)गौतम भंडारे (पत्रकार) गणेश जाधव (पत्रकार) अमोल साठे (पत्रकार) शाहरुख मुलाणी या पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे

पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन दिनांक: शनिवार, १ ऑगस्ट २०२६ वेळ: सकाळी ठीक १०:३० वाजता
स्थळ: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (जुन्या बस स्टँड शेजारी), अकलूज येथे होणार आहे

या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यास अकलूज शहर व परिसरातील नागरिकांनी, पत्रकार बंधूंनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button