शहर

पर्यावरण संवर्धनाचा आदर्श संदेश! अकलूज मुस्लिम दफन भूमी येथे GNRF आणि मदनी फाउंडेशनच्या वतीने भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न.जुन्या कब्रस्तान परिसरात रंगला वृक्षारोपण सोहळा; शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती!

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network

अकलूज:पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि “वृक्ष वाचले तर जीवन वाचेल” हा अमूल्य संदेश समाजात रुजवण्यासाठी अकलूजमध्ये एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) आणि मदनी फाउंडेशन, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी जुन्या कब्रस्तान (मुस्लिम दफन भूमी) परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सकाळी १०:३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात ‘चला मिळून धरतीला हिरवे करूया’ अशी साद घालत दोन्ही संस्थांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला. कब्रस्तान परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि पर्यावरणास पूरक असणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले. यामध्ये प्रामुख्याने: शिवतेजसिंह मोहिते पाटील (उपनगराध्यक्ष, अकलूज नगर परिषद) सचिन देशमुख, मोहसीन शेख, विशाल मोरे, अजहर शेख, विलास क्षीरसागर (सर्व नगरसेवक, अकलूज नगर परिषद) लखन गायकवाड, भैय्या तिकोटे, लालासाहेब आडगळे, साजिद भाई सय्यद (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग सोलापूर जिल्हा संघटक) हाजी अबूबकर तांबोळी (संस्थापक अध्यक्ष, ताहेरा फाउंडेशन)

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये GNRF चे अकलूज शहराध्यक्ष जुबेर भाई सय्यद, मौलाना गुलाम मोहम्मद, इम्तियाज सय्यद, अशफाक शेख तसेच मदनी फाउंडेशन अकलूजचे अध्यक्ष कमाल भाई शेख, उपाध्यक्ष भैय्या माढेकर, खजिनदार इनुस मुलाणी, सचिव इर्शाद सय्यद, सदस्य जाकीर शेख, अजहर पठाण, दावल नदाफ, जावेद भाई तांबोळी, मोहसीन बागवान आणि अन्वर भाई बागवान यांचा समावेश होता.

तसेच बजमे अनवारे सोफिया मदरसाचे सेक्रेटरी युसूफ भाई शेख, सलीम सय्यद, मुबीन भाई फुटाणकर आणि पीरखान शेख मित्र मंडळाचे सर्व सदस्य आयोजनात सक्रिय सहभागी होते.

या प्रसंगी हाजी अब्दुल मतीन सौदागर, शाहीर अली शेख, अकबर भाई तांबोळी, पंचवटीचे युवा नेतृत्व तय्यब भाई मुलाणी, शहाजी माने यांच्यासह अकलूज आणि परिसरातील सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही संस्थांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे अकलूज शहरातून आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button