शारदेय नवरात्री विशेष काळमवाडी (ता.वाळवा) येथील काळम्मादेवी मंदिराला ‘ क ‘ वर्गात समावेश

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो.- 8007932121
तमाश्याची काळमवाडी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले गाव आता नव्याने काळम्मादेवीच्या महत्मामुळे प्रसिद्ध झाले आहे देवीला श्रावणात मंगळवार शुक्रवार, नेहमी आणि महत्वाचे गुढी पाडवा आणि नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस भक्तांची असणारी गर्दी चा अहवाल वाळवा तालुका तहसील दार आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार महाराष्ट्र शासन यांनी काळम्मादेवी मंदिर हे क प्रवरगात समावेश करून सांगली जिल्ह्यामध्ये गाव प्रसिद्धीस आले आहे.
शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याच प्रमाणे काळमवाडी गावात देवीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो.

नवरात्रीच्या नव दिवसात देवीचे नऊ रूपांचे दर्शन करावयास मिळते, नवरात्रीतील आठव्या दिवशी काळम्मादेवीचा जागर असतो म्हणजे गावची यात्रा असते पूर्ण महाराष्ट्रातील भाविक त्या दिवशी दर्शनाचा लाभ घेतात. आणि विजयी दशमी दसरा या दिवशी या उत्सवाची सांगता होते, हे नऊ दिवस गावामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाते, ज्ञानेश्वर सप्ताह असतो, नऊ दिवस समाज आणि युवक पर्भोदणात्मक व्याख्याने आयोजित केले जातात.



