महाराष्ट्र

कुकडी प्रकल्पामधून मांगी तसेच कुंभेज तलावामध्ये पाणी सोडण्यात यावे,, बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यातील मांगी व कुंभेज तलावामध्ये पाणी सोडण्यात यावे अशा मागणी चे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले

पावसाळा संपत आला आहे तरीही करमाळा तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही त्यामुळे तलावामध्ये पाणी कमी आहे करमाळा तालुक्यातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे मांगी व कुंभेज तलावामध्ये पाणी सोडल्यास तीस ते पस्तीस गावांना फायदा होणार आहे पिण्याच्या पाण्याचा जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे तरी ताबडतोब आठ दिवसांमध्ये पाणी सोडण्यात यावे न पाणी सोडल्यास 27/10/2023 रोजी शुक्रवार सकाळी अकरा वाजता पोथरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी व ताबडतोब मांगी व कुंभेज तलावामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

यावेळी निवेदनावर सह्या केलेले बळीराजा शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष अनिल तेली वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुभाष ओहोळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल घुमरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे नवनाथ कोळेकरशहाजीधेडे संतोष पाटील किसन हनपुडे आधी जन पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button