आलेगाव (बु) येथील प्रत्येक घरात एक पैलवान तयार करणार,-पै. संतोष (आप्पा) चंदनकर

टेंभुर्णी प्रतिनिधी :नानासाहेब चंदनकर
मो-8208530338
कोंढारभागातील शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे आलेगाव (बु) कारण या गावामधुन मोठ-मोठे अधिकारी भैरवनाथ विद्यालयाच्या मार्फत घडलेले आहेत तसेच अनेक शिक्षकांनी विना पगारी काम करून पोटाची उपासमार करुन हे अधिकारी घडलेले आहेत. त्यामुळे आलेगाव (बु) चे नाव कोंढारभागात नव्हे तर माढा तालुक्यात प्रसिद्ध झालेले आहे.
अशा पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीत गावाची प्रगती असताना बराचसा तरून वर्ग “व्यसनाधिनतेकडे “वळुन स्वत:च्या शरिराचे त्याचबरोबर स्वत:च्या घराचे ही नुकसान करत होता. अशातच आलेगाव (बु)चे युवा नेते नव युवकांचे प्रेरणास्थान गोरगरिबांचे कैवारी मा.सरपंचप पै. संतोष (आप्पा )चंदनकर यांनी स्व खर्चाने स्वतःच्या संसाराची तमा न बाळगता श्री भैरवनाथ व्यायाम शाळेची स्थापना केली. त्याचे उद्घाटन तालुक्यातील अनेक नामवंतांच्या हस्ते झाले. त्या नामवंतापैकी सर्वांनी श्री.भैरवनाथ व्यायाम शाळेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर येत्या काही वर्षात श्री. भैरवनाथ व्यायाम शाळेतील पैलवान अनेक महाराष्ट्र केसरी होतील काही नामवंत अधिकारी होतील अशा शुभेच्छा नामवंतांनी दिल्या.

सध्या या व्यायाम शाळेत ७०ते८० मुले सराव करत आहेत. त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था मा. सरपंच पै. संतोष (आप्पा) चंदनकर यांनी स्वखर्चाने केलेली आहे. या व्यायाम शाळेचे वस्ताद म्हणून नामांकित गाजलेले मा.पै.बाळासाहेब चंदनकर हे करत आहेत.
अशा पद्धतीने सर्व गावातील प्रत्येक घरातील एक -दोन, एक-दोन असे पैलवान तयार करून महाराष्ट्र केसरी पर्यंत उतरवणारच अशा पद्धतीचे अवाहन सर्व ग्रामस्थांना केले आहे.



