निधन वार्ता

​दुःखद बातमी: ‘अकलूज एक्सप्रेस’चे संपादक आमीर मोहोळकर यांच्या पत्नी नूजहत परवीन यांचे अल्पशा आजाराने निधन

Times 9 Marathi News Network

​अकलूज:येथील रहिवासी नूजहत परवीन आमीर बागवान (मोहोळकर) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, दोन दिर, सासू, जावई आणि नात असा मोठा बागवान-मोहोळकर परिवार आहे.

​नूजहत परवीन या दिवंगत पत्रकार युसुफ मोहोळकर यांच्या सून, तर ‘अकलूज एक्सप्रेस’चे संपादक आणि ‘दैनिक लोक सह्याद्री’चे अकलूज शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने मोहोळकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अकलूज परिसरातील पत्रकारिता क्षेत्रासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नूजहत परवीन यांच्या पार्थिवावर शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी पार पडला.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच दिग्गज व्यक्तींनी मोहोळकर परिवाराचे सांत्वन केले. विविध क्षेत्रांतील नामवंतांनी उपस्थित राहून दिवंगत नूजहत परवीन आमीर बागवान (मोहोळकर) यांना “भावपूर्ण
श्रद्धांजली” अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button