निधन वार्ता

माळीनगरचे रहिवासी निजामभाई मुलाणी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

​पत्रकार रियाज मुलाणी यांचे वडील परिसरात हळहळ व्यक्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​माळीनगर (माळशिरस, सोलापूर) माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी जनाब निजामभाई चांदभाई मुलाणी (वय ८२ वर्षे) यांचे आज, मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने माळीनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

​निजामभाई मुलाणी हे अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ वृत्तीचे म्हणून परिचित होते. ते ‘टाईम्स ९ मराठी न्युज व महाराष्ट्र नगरी न्यूज नेटवर्क ‘चे पत्रकार रियाज मुलाणी यांचे वडील होत. तर माळीनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आसमा रियाज मुलाणी यांचे सासरे होत.

​त्यांच्या पश्चात, एक मुलगा, तीन मुली,जावई, सून, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

​दफन विधी आज, मंगळवार (दि. २५) रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये दफन विधी करण्यात येणार आहे.

​तिसऱ्याचा जारत विधी: शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये होणार आहे.

​टाईम्स ९ मराठी न्युज नेटवर्क समूहातर्फे जनाब निजामभाई मुलाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो. 😔💐🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button