निधन वार्ता

​दुःखद : अकलूजचे ज्येष्ठ पत्रकार शंकर काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार शंकर बबनराव काळे (वय ५०) यांचे शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने अकलूजमधील पत्रकारिता क्षेत्रासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.

शंकर काळे हे त्यांच्या मनमिळाऊ आणि धार्मिक स्वभावासाठी ओळखले जात होते. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षं समाजाचे प्रश्न मांडले. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सकाळी अकलाई स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button