पालघर जिल्हा परिषदेच्या टेंभीखोडावे शाळेत केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
विद्यार्थ्यांच्या सप्त गुणांना वाव देण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होणाऱ्या टेंभीखोडावे शिक्षण केंद्रामार्फत एक दिवसीय केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन शुक्रवारी टेंभीखोडावे शाळेत करण्यात आले होते.
या स्पर्धांचे उद्घाटन टेंभीखोडावे ग्रामपंचायत उपसरपंच धनेश गावड, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष चंदना पाटील, आणि केंद्रप्रमुख माधुरी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले .या स्पर्धांमध्ये समूह गायन, नाट्य स्पर्धा,वकृत्व स्पर्धा आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये या केंद्रातील विराथन बुद्रुक, विराथन खुर्द, टेंभीखोडावे, जलसार, किरईपाडा, खोडावेपाडा, दारशेतपाडा, विठ्ठलवाडी,चिखलपाडा या नऊ शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा विराथन बुद्रुक आणि द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा खोडावेपाडा तर समूह गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा जलसार आणि द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा चिखलपाडा तसेच वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा विराथन बुद्रुक आणि द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा जलसार यांनी पटकावला असून शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पटकावला आहे.
यावेळी उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टेंभीखोडावे ग्रामपंचायत उपसरपंच धणेश गावड यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.



