राहुरी – पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन…

🎯 अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाचे सावट,अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
राहुरी – नगर – पाथर्डी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब यांचं आज वयाच्या ६६ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले…
अहिल्यानगर जिल्ह्यात शून्यातून स्वतःच्या परिश्रमाने व सातत्याने जल प्रश्नांवरती सक्रिय भूमिका घेऊन अहोरात्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणे हा ध्यास घेऊन स्वतःच्या कर्तबगारिने कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना उत्तुंग यश मिळवले…
ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अचानक दु:खद निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे…
शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये अहिल्यानगर,राहुरी,पाथर्डी तालुका असेल सातत्याने विकासाची भूमिका घेऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला…

शिक्षण कमी असताना देखील स्वतःच्या बुद्धीने त्यांनी प्रचंड भरीव योगदान दिलेले आहे.प्रचंड जनसंपर्क हे त्यांची वैशिष्ट्य होते.अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रातील त्यांच्या योगदानातील जाणीव सतत ठेवण्यात येईल…
त्यांच्या या अकाली जाण्याने अहिल्यानगर जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी हानी आणि पोकळी निर्माण झाली आहे…
आपल्या कार्यकाळात त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने काम केलं,गावोगावी जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या,शेती,शिक्षण,पाणीपुरवठा,रस्ते आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलं…
राज्यमंत्री,आमदार आणि अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी सहकार,शेतकरी आणि ग्रामीण भागातील सामान्य माणसाचं हित जपणारं कार्य केलं.लोकांशी नाळ जोडलेला,साधेपणातही प्रभावी आणि लोकाभिमुख नेता,अशी त्यांची ओळख होती.त्यांच्या विचारांची आणि कार्यशैलीची परंपरा पुढे नेणं,हेच त्यांच्या प्रति खरं श्रद्धांजलीचं रूप असेल.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो,हीच प्रार्थना..!



