स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे दुःखद निधन; संगीत विश्वावर शोककळा

(टाईम्स ९ मराठी न्यूज नेटवर्क)
भारतीय संगीत क्षेत्रातील एक अद्वितीय नाव, ज्यांच्या आवाजाने गेली सात दशके रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले, त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे.
आशाताईंनी मराठी, हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लावणी, गझल आणि पाश्चात्य ढंगाची गाणी अशा सर्व प्रकारांत त्यांनी आपल्या आवाजाचा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या गायकीतील वैविध्य आणि ऊर्जेमुळे त्या जगभरातील संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत होत्या.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन सृष्टीसह राजकीय आणि सामाजिक स्तरातून मोठी शोककळा पसरली आहे. भारताच्या या ‘सुरेल’ प्रवासाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

टाईम्स ९ मराठी न्यूज नेटवर्कतर्फे आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!



