महाराष्ट्र

इंस्टाग्राम वरील ओळख विवाहित पुरुषाने विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

इंस्टाग्राम वर ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मात्र दोघेही विवाहित असल्या कारणामुळे विवाहित पुरुषाने विवाहित महिलेला लग्नाला नकार दिला म्हणून या महिलेने या पुरुषाविरुद्ध पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या आरोपीला रविवारी केळवा सागरी पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.

केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील एका (32) वर्षीय विवाहित महिलेची एका (32) वर्षीय विवाहित पुरुषाची इंस्टाग्राम वरील मैत्री घट्ट झाल्यावर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मौजमस्तीत फिरण्यासाठी हे दोघं पालघर जिल्ह्यातील केळवा बीचवर गेले असताना या विवाहित पुरुषाने या विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले व एका हॉटेलवर घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यानंतर या विवाहित पुरुषाने या महिलेला लग्नाला नकार दिला म्हणून या महिलेने या पुरुषाविरुद्ध केळवा सागरी पोलिसात तक्रार दिली होती.या तक्रारीवरून या (32) वर्षीय पुरुषाचा केळवा सागरी पोलिसांनी शोध घेऊन त्याला
रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी पुणे येथून अटक करून त्याच्या विरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 नुसार फसव्या मार्गाचा वापर करून लग्नाचे खोटे अमित दाखवून लैंगिक संबंध ठेवल्या कारणावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास केळवा सागरी पोलीस ठाणे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button