शेतकरी कल्याणासाठी दिलेल्या योगदानाची दखल; जावेद पठाण यांना नाशिकमध्ये ‘समाज रत्न’ पुरस्कार प्रदान!

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना ‘जय किसान फार्मर्स फोरम’ यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठित “समाज रत्न” पुरस्कार जावेद गफूर पठाण यांना प्रदान करण्यात आला. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जावेद पठाण यांनी केलेले उल्लेखनीय कार्य आणि त्यांचा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ‘आमची माती आमची माणसं’ या ब्रीदवाक्याला जागून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिकच्या नेहरू गार्डन येथील प. सा. नाट्यगृहात १० एप्रिल २०२६ रोजी हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी प्रा. डॉ. संजय जाधव (संस्थापक, जय किसान फार्मर्स फोरम) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पठाण यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल जावेद पठाण यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.



