उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे व्यापक आयोजन करण्यात आलेहोते . कमारे, वरखुंटी, टोकराळे, वावेपाडा, वाक सई आणि केळवा रोड या गावांमधील अंगणवाडी केंद्रे तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम उत्साहात व मोठ्या प्रमाणावर पार पडला.
या उपक्रमा अंतर्गत कमारे, वरखुंटी, टोकराळे, वावेपाडा, वाकसई तसेच केळवारोड येथील विद्यावैभव प्रतिष्ठान तसेच जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे १००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन जोड कपडे, एक शाळेची बॅग आणि एक स्टीलची पाण्याची बाटली देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळाले.
याचबरोबर, अंगणवाडी केंद्रांतील लहान मुलांनाही या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. बालकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठीही आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.

टोकराळे येथील नियोजित पॉलिस्टर पार्कच्या जागेवर सुमारे अडीचशे नागरिकांसाठी भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
तसेच, सुमारे १००० दुर्गम भागातील विविध पाड्यांवरील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त सुमारे १००० लोकांना मिठाईचे वितरण करून आनंदाचा गोडवा वाढवण्यात आला.
या विविध उपक्रमांमुळे परिसरात समाधान, आनंद आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी अनंत अंबानी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचत असल्याचे नागरिकांनी आनंद व्यक्त केला .



