टेंभीखोडावे भाटीचा पाडा येथे केळवा सागरी पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या हस्ते अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :703056640
पालघर जिल्ह्यातील टेंभीखोडावे ग्रामपंचायत हद्दीतील भाटीचापाडा या गावात एल अँड टी कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR ) या फंडातून बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या केळवा सागरी पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या हस्ते या नवीन दहा लाख रुपये किंमत असलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व मान्यवरांना केंद्र सरकारच्या कल्याणकारी ग्रामीण आणि शहरी प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले.भाटीचा पाडा या गावातील जुन्या अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली होती.
ही इमारत पडून दुर्घटना होऊ नये या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन टेंभीखोडावे गावचे उपसरपंच धनेश गावड यांनी ही बाब एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यावर त्यांनी त्वरित या अंगणवाडीसाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.
या निधीतूनही ही अत्याधुनिक अंगणवाडी उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला टेंभीखोडावे गावच्या सरपंच शोभा पाटील आणि उपसरपंच धणेश गावड, जलसार ग्रामपंचायत सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विंकोष म्हात्रे आणि एल अँड टी कंपनीचे मुन्ना तिवारी, बिश्वनाथ मुदली, संतोष सोनी, कॅप्टन इजाज, महेश जगताप असे अनेक अधिकारी उपस्थित होते.



