युवासेना माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख पदी विजय कोकणे यांची निवड; अकलूजमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख पदी विजय कोकणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निवडीमुळे तालुक्यातील युवा सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या विस्तारिकरणाला वेग आला आहे. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार, ‘S.I.R.’ प्रक्रिया, मतदार यादी अद्ययावत करणे आणि युवासेना सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे.
युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी व मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या आदेशाने, युवासेना मध्यवर्ती कार्यालय (ठाणे) येथून माढा लोकसभा संपर्कप्रमुख सुजित खुर्द यांच्या वतीने विजय कोकणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बुथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करणार: विजय कोकणे
आपल्या निवडीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विजय कोकणे म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी युवकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करेन. ग्रामीण भागात युवासेनेचे मजबूत जाळे उभे करून, बुथ लेव्हलपर्यंत सक्षम पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावर माझा विशेष भर राहील.”

विजय कोकणे यांची निवड जाहीर होताच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अकलूज येथे त्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सत्कार समारंभांचेही आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, युवासैनिक आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.



