क्राईम

पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायत महिला सरपंचांना लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांनी केले रंगेहात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांनी ना हरकत दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्यांना बुधवारी संध्याकाळी पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्या विरुद्ध तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायत हद्दीतील तक्रारदार यांना डाय मेकरचा बिजनेस करण्यासाठी एसबीआय बँकेतून कर्ज काढायचे होते त्यासाठी बँकेने तक्रारदार यांच्याकडे ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. हा दाखला मागण्यासाठी तक्रारदार तारापूर ग्रामपंचायत सरपंच संध्या संजय पागधरे वय वर्ष (49 ) यांच्याकडे गेले असताना त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी या महिला सरपंचांची लेखी तक्रार पालघर अँटी करप्शन विभाग यांच्याकडे केली होती.

या तक्रारीची पालघर अँटीकरप्शन विभागाने पडताळणी करून शिवराज पाटील पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र, आणि सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर लाच लुचपत प्रतिबंध विभाग पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे आणि पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोfलीस हवालदार विलास f, नवनाथ भगत, जितेंद्र गवळे गीता कहार आणि आकाश लोहारे यांच्या पथकाने बुधवार दिनांक 13 मे रोजी संध्याकाळीfसापळा रचून ग्रामपंचायत तारापूर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तारापूरf ग्रामपंचायत सरपंच संध्या पागधरे यांना पंचा समक्ष तक्रारदारf यांच्याकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button