क्राईम

पती घराबाहेर जाताच पत्नीची गळादाबून हत्या करणाऱ्या आरोपीच्या 24 तासात कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी आवळल्या मुस्क्या

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव खोरीपाडा येथे एका (45)वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सुनिता जेठ्या गोवारी असे मृत महिलेचे नाव असून त्या आपल्या पतीसोबत फॉरेस्ट प्लॉटवरील एका शेत झोपडीत राहत होत्या.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीला कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी अवघ्या 24 तासात अटक करून जेरबंद केले आहे

मिळालेल्या माहितीनुसार 13 मे रोजी सकाळी सुनिता यांचे पती जेठया गोवारी हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. पती घरी नसल्याची संधी साधून आरोपीने झोपडीत प्रवेश केला आणि सुनिता यांची गळा आवळून हत्या केली.
ही घटना सकाळी 8 ते रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समोर आले असून पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. संशयावरून पोलिसांनी दामा लाडक्या खरपडे (वय 50, राहणार मोडगाव) याला ताब्यात घेतले असून सखोल चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला शुक्रवारी डहाणू न्यायालयता हजर केले असून याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर पाटील आणि कासा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button