पंचायत समिती माळशिरसचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार युन्नूस तांबोळी सर यांना जाहीर; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
माळशिरस : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पंचायत समिती माळशिरसच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार श्री. युन्नूस तांबोळी सर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युन्नूस तांबोळी सर यांनी आजवर आपल्या प्रदीर्घ सेवेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेच्या गुणवत्तेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. एक ‘एव्हरग्रीन मुख्याध्यापक’ म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच निष्ठेची आणि कर्तव्यदक्षतेची दखल घेत प्रशासनाकडून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षण प्रेमी आणि विविध स्तरातील मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस ‘टाइम्स ९ मराठी न्यूज’ परिवारातर्फे देखील मनापासून शुभेच्छा!



