महाराष्ट्र

“विकासरत्न” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते “ताहेरा फाऊंडेशन” ने केली होतकरू विद्यार्थ्याला “लॅपटॉप” ची मदत…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

त्याचे झाले असे की लुमेवाडी – इंदापूर येथील अब्दाल शेख या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याने “ताहेरा फाऊंडेशन” चे हाजी अबूबकर तांबोळी यांच्या कडे आपल्या परिस्थितीची सर्व कहानी कथन केली आणि स्वतःच्या पुढील शिक्षणासाठी “लॅपटॉप” ची आतोनात गरज असल्याचे सांगीतले…

हाजी अबूबकर तांबोळी यांनी “ताहेरा फाऊंडेशन” च्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्या नंतर आणि अब्दाल शेख या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्याची चौकशी केल्या नंतर त्याला “लॅपटॉप” ची गरज असल्याचे समजले…

“ताहेरा फाऊंडेशन” ने त्या विद्यार्थ्यांचा विषय गांभीर्याने घेत त्याला तात्काळ “लॅपटॉप” द्यायचे जाहीर केले,तद्नंतर “विकासरत्न” विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या हस्ते “शिवरत्न” बंगला येथे लुमेवाडी – इंदापूर येथील अब्दाल शेख या विद्यार्थ्यांला “लॅपटॉप” देण्यात आले…

या वेळी ताहेरा फाऊंडेशन च्या स्थापने पासून केलेल्या सर्व उपक्रमाची धावती क्षणचित्रे (फोटो) विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना दाखवल्या नंतर त्यांनी “ताहेरा फाऊंडेशन” च्या कार्याचे कौतुक करत अब्दाल शेख या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यास पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा सह आशीर्वाद देत “लॅपटॉप” सुपूर्द केले…

सदरचा छोटेखानी कार्यक्रम “शिवरत्न” बंगला येथे पार पडला,या वेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ कमालभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते मुख्तार कोरबु,हाजी मौलाभाई मुलाणी,शब्बीर शेख,जावेद (बाबा) तांबोळी,रफिक तांबोळी यांच्या सह “ताहेरा फाऊंडेशन” चे पदाधिकारी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button