निधन वार्ता

सोलापूर मार्केट यार्ड येथील प्रतिष्ठित व्यापारी लाडले मशाक लालअहमद कामतीकर यांचे निधन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सोलापूर मार्केट यार्ड येथील प्रतिष्ठित व्यापारी लाडले मशाक लालअहमद कामतीकर यांचे काल सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय 51 वर्षांचे होते…

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर मार्केट यार्ड येथे कांदा आणि लसूणचे अडतदार असलेले लाडलेमशाक लालअहमद कामतीकर यांच्या मागे आई,पत्नी,दोन भाऊ,एक बहीण आणि एक मुलगा आणि दोन मुली,जावई असा मोठा परिवार असून त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेक जणांनी शोक व्यक्त केला…

लाडलेमशाक लालअहमद कामतीकर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते,काल त्यांच्यावर सोलापूर येथील चिरागअली कब्रस्तान येथे अंतिम संस्कार करण्यात आले…

सोलापूर येथील बागवान समाजातील युवक कार्यकर्ते इम्तियाज (घायल) कामतीकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होते,काल त्यांच्या अंत्य संस्कारवेळी समाज घटकांतील सर्व मंडळी,व्यापारी,शेतकरी उपस्थित होते…

टाइम्स 9 न्यूज अकलूज परिवार आणि आमीर मोहोळकर यांच्या परिवाराच्या वतीने स्व लाडलेमशाक लालअहमद कामतीकर यांना “भावपुर्ण श्रध्दांजली” अर्पण करण्यात आली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button