सुरुंग स्फोटामुळे नुकसान झालेल्या सफाळे विराथन बुद्रुक ,जलसार येथील घरमालकांना मिळणार नुकसान भरपाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
मुंबई अहमदाबाद जळतगती बुलेट ट्रेन प्रकल्प सुरुंग स्फोटामुळे नुकसान झालेल्या घरमालकांना अखेर नुकसान भरपाई देण्याचे एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्याने मान्य केले आहे याबाबत नुकतीच जलसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामस्थ, गावकरी, सरपंच,सदस्य आणि बुलेट ट्रेन अधिकारी आणि केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या समक्ष बैठक पार पडली.
केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विराथन बुद्रुक ,जलसार, टेंभीखोडावे या हद्दीतील मेघराज डोंगराच्या हद्दीतून हा बुलेट ट्रेन प्रकल्प अहमदाबाद कडे जाणार आहे.यासाठी या हद्दीत मेघराज डोंगराच्या आतून बोगदा तयार करण्यात येत आहे.
हा बोगदा तयार करण्यासाठी सुरुंग स्पोर्ट केले जात आहेत. या सुरुंग स्फोटामुळे पालघर जिल्ह्यातील सफाळे विराथन बुद्रुक, चाफेवाडी जलसार, किरईपाडा, तलावपाडा चिखलपाडा टेंभीखाडावे या गावातील 200 घरे बाधित झाली असून सुरुंग स्पोटामुळे या घरांना मोठमोठ्या भेगा गेल्या आहेत. याबाबत एल अँड टी कंपनीकडून सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेनुसार या भागातील 200 घरमालकांना नुकसान भरपाई देण्याचे एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक अधिकारी बिश्वानाथ मुदुली यांनी जलसार येथे पार पडलेल्या बैठकीत मान्य केले आहे.

सध्या मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या दरम्यान घर घरमालकांच्या घरांचे नुकसान झाल्यास रिसर्वेकरून त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. अशी माहिती बुलेट ट्रेन चे व्यवस्थापकीय अधिकारी बिश्वनाथ मुदुली यांनी पुढारी वार्ताहर यांना दिली.यावेळी या बैठकीला बुलेट ट्रेनचे व्यवस्थापक अधिकारी बिश्वनाथ मुदुली, केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, जलसार सरपंच सौ. साक्षी गजानन गावड, उपसरपंच विंकुश म्हात्रे , सदस्य ग्रामस्थ आणि बाधित घरमालक उपस्थित होते.
सुरुंग स्फोटामुळे विराथन बुद्रुक, जलसार ग्रामपंचायत हद्दीतील बाधित झालेल्या घर मालकांना योग्य मोबदला लवकरात लवकर देण्यात येईल.. गरज पडल्यास पुन्हा रीसर्वे करण्यात येईल.बुलेट ट्रेन व्यवस्थापक अधिकारी
बिश्वनाथ मुदुली



