अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे यांनी शिखर शिंगणापूरच्या महादेवाला घातलं साकडं…

🎯“आरोग्यदूत” रामभाऊ सातपुते पुन्हा एकदा आमदार व्हावे म्हणून अकलूज ते शिखर शिंगणापूर केला पायी वारीचा संकल्प…
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे सक्रिय सदस्य महेश शिंदे यांनी शिखर शिंगणापूर येथे जाऊन श्री शंभो महादेवाच्या चरणी साकडं घातलं.”आरोग्यदूत” रामभाऊ सातपुते लवकरच पुन्हा एकदा आमदार व्हावेत,यासाठी महेश शिंदे यांनी प्रार्थना केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली
यावेळी महेश शिंदे यांनी सांगितले की,रामभाऊ सातपुते साहेब हे जनतेच्या आरोग्य आणि विकासासाठी झटणारे खरे “लोकनायक” आहेत.सातपुते साहेब लवकरच पुन्हा आमदार होतील याची मला खात्री आहे आणि त्या दिवशी मी अकलूज ते शिखर शिंगणापूर अशी पायी वारी करून माझा संकल्प पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले
काहीं दिवसां मध्येच जाहीर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी साठी माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस सह अकलूज,नातेपुते,म्हाळुंग येथील भाजपाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना बळ देण्याचे मोठे कार्य हाती घेतल्याचे यावरून दिसत येत आहे
मागील आठवड्या मध्ये युती सरकारचे एक मंत्री माळशिरस तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनीही माजी आमदार राम सातपुते यांच्या राजकीय भविष्याचे सुतोवाच केले होते…
हाच धागा अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे यांनी धरून शिखर शिंगणापूरच्या महादेवाला अकलूजहून चालत जाण्याचा मानस जाहीर केल्याने माजी आमदार राम सातपुते यांना आमदारकीचा चान्स कधी मिळतो ? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे
सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या संकल्पामुळे अकलूज परिसरात चर्चेला मात्र उधाण आलं आहे.राम सातपुते समर्थकांमध्ये यामुळे नवीन उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.
याच्या उलट पहायला गेल्यास माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर गट अद्यापही “गाफील” असल्याचे दिसून येत आहे आणि या दोन्हीं गटातील कार्यकर्ते मात्र “सैराट” झाल्याचे पहायला मिळत आहे…



